Latest

Sologamy marriage : ‘तिने’ तीन दिवस आधीच गुपचूप उरकला ‘स्‍व:विवाह’ !

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्‍वत:शीच विवाह (Sologamy marriage ) करण्‍याची घोषणा केल्‍याने बिंदु साक्षी या वडोदरा येथील २४ वर्षीय तरुणीचे नाव देशभरात चर्चेला आले. तिने ११ जून रोजी स्‍व:विवाह करण्‍याची घोषणा केली होती. मात्र विरोध आणि वाद टाळण्‍यासाठी तिने बुधवार ८ जून रोजीच स्‍व:विवाह केला. आपले नातेवाईक आणि मैत्रीणीच्‍या उपस्‍थिती तिने हा सोहळा उरकला.

क्षमाचा निर्णय विदेशातील वेब सीरिजमुळे : सुनीता शुक्‍ला

क्षमा बिंदुच्‍या स्‍व:विवाहावरुन वाद सुरु झाला होता. हिंदू धर्मात अशा प्रकारच्‍या विवाहाला मान्‍यता नाही. तिने मंदिरात कशा प्रकारचा विवाह करु नये, असा इशारा वडोदराच्‍या माजी उपमहापौर सुनीता शुक्‍ला यांनी दिला होता. भारतीय विवाह
पद्धतीमध्‍ये अशा प्रकारच्‍या विवाहाला मान्‍यता नाही. क्षमा बिंदूने घेतलेला निर्णय हा विदेशातील वेब सीरिजच्‍या प्रभावामुळे घेण्‍यात आला आहे. अशा प्रकारच्‍या विवाहाला मान्‍यता दिली याचा दुष्‍परिणाम होईल, अशी भीतीही त्‍यांनी व्‍यक्‍त केली होती.

Sologamy marriage : विरोधामुळे गुपचूर उरकला स्‍व:विवाह

विरोधामुळे क्षमाने अखेर आपल्‍या घरात विवाह करण्‍याचा निर्णय घेतला. काही नातेवाईक आणि निवडक मित्र-मैत्रीणीसोबत तिने 'विना वर' हा सोहळा पार पडला. असे मानले जात आहे की, हा देशातील पहिला स्‍व:विवाह आहे.

क्षमाने म्‍हटलं होतं की, नववधू होणे हे माझं स्‍वप्‍न

या अनोख्‍या लग्‍नाबाबत क्षमा बिंदू हिने म्‍हटलं होतं की, "मला कधीच लग्‍न करायचे नव्‍हते; परंतू नववधू होणे हे माझं स्‍वप्‍न होतं. त्‍यामुळे मी स्‍वत:शीच लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. देशात यापूर्वी असं कोणी केलं आहे का? याचा मी गुगलवर शोध घेतला;पण मला  तरी कोणीही स्‍वत:शीच लग्‍न केल्‍याचे उदाहरण आढळलं नाही. मी या देशातील स्‍वत:च्‍या प्रेमात पडून स्‍वत:शीच लग्‍न करणारी एकमेव तरुणी असेन."

स्‍व-लग्‍न' म्‍हणजे स्‍वत:वर विनाअट प्रेम करणे. तुम्‍ही स्‍वत:ला आहे तसे स्‍वीकारणे आहे. भिन्‍न व्‍यक्‍तींवर प्रेम करुन लग्‍न केले जाते. मी स्‍वत:च्‍याच प्रेमात पडली असल्‍याने मी माझ्‍याशी लग्‍न करत आहे, असेही क्षमाने स्‍पष्‍ट केले होते. काही जणांना वाटेल स्‍व-लग्‍न ही संकल्‍पनाच असंबद्‍ध आणि मुर्खाची आहे;पण मला वाटतं की, कोणाशी लग्‍न करावे याचा अधिकार महिलांना असावा. यासाठी मी सर्वांना याची माहिती देत आहे. मला माझ्‍या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. ते खुल्‍या विचाराचे आहेत. त्‍यांच्‍या मला आशीर्वाद आहे, असेही क्षमाने नमूद केले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT