Latest

Konkan kandalvan Safari : कांदळवनांचं पर्यटन करणाऱ्या गावात नक्की जा!

स्वालिया न. शिकलगार

स्वालिया शिकलगार- पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील लेखामध्ये आम्ही तुम्हाला वेळणेश्वरसह हेदवी, बामणघळविषयी माहिती दिली होती. तुम्हाला तो लेख नक्कीच आवडलाही असेल. आता आम्ही तुम्हाला कांदळवनांबद्दल सांगणार आहोत. (Konkan kandalvan Safari) त्याचसोबत श्रीवर्धन, हरिहरेश्वर, श्रीवर्धन बीच, अरवी बीच, घुमचे घुमेश्वर मंदिर आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अनेक ठिकाणांविषयी माहिती देणार आहोत. कांदळवनांचं पर्यटन करणारे गाव म्हणून 'काळिंजे' प्रसिद्ध आहे. समुद्रालाच आपला देव मानणारे आणि त्याची पूजा करणारे येथील माणसं निसर्गाची राखण कशी करतात, याची अद्भुत सफर घडवणारी कांदळवनांची सफर आयुष्यात एकदा का होईना, करायलाचं हवी. नेहमीपेक्षा थोडीशी हटके असणारे ही ट्रीप तुम्हाला न विसरणारी ठरेल! (Konkan kandalvan Safari)

तांबळडेग, सिंधुदुर्गमध्ये कांदळवने पाहायला मिळतात. मालवणमध्येही, वेंगुर्ल्यातील एका बीचवरही कांदळवन आहे. पण आज आम्ही तुम्हाला रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गावातील निसर्ग पर्यटनाविषयी सांगणार आहोत. सोबत अरवी, हरिहरेश्वर, आरवी बीचविषयी सांगणार आहोत.

shrivardhan beach

श्रीवर्धन –

श्रीवर्धन हा रायगड जिल्ह्यातील निसर्गाने नटलेले तालुक्याचे ठिकाण आहे. नारळ, पोफळी आणि सुपारीच्या बागांनी वेढलेले श्रीवर्धन तीर्थक्षेत्रामुळेही प्रसिद्ध आहे. पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान श्रीवर्धन होय. पेशव्यांचे शहर म्हणूनही श्रीवर्धन'ला ओळखले जाते. धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून या ठिकाणांना अवश्य भेट द्यायला हवी.

कोंडवील बीच

श्रीवर्धन बीच –

अतिशय स्वच्छ असे श्रीवर्धनचे बीच आहे. एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत अशी श्रीवर्धनची भौगोलिक रचना आहे. लांब पसरलेले रुंद समुद्रकिनारे आणि शांतता हे येथील वैशिष्ट्य म्हणता येईल. येथे घोंगवणारा वारा आणि नीरव शांततेत सूर्यास्त पाहणे म्हणजे 'व्वा! अप्रतिम'. येथे घोडेस्वारी, बग्गीतून फेरफाटका मारता येतो. तुम्ही जण सहलीचा प्ल्रॅन करत असाला तर श्रीवर्धनला नक्की जा.

हरिहरेश्वर

कसे जाल?

श्रीवर्धनला रेल्वे आणि बसने जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव आहे. ४५ किमी. प्रवास करून तुम्ही रेल्वेने श्रीवर्धनला पोहोचू शकता. श्रीवर्धन हे अलिबागपासून ११७ किमी. अंतर तर मुंबईपासून १८२, तसेच पुण्यापासून १६२ किमी. अंतर आहे.

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारक

काय खाल?

सीफूडची चव चाखण्यासाठी येथे एक रात्र घालवावी लागेल. ताजे मासे, बोंबील, सुरमई, पापलेट, बांगडा, तारली, कोळंबीची टेस्टी टेस्टी चव चाखायला कुणाला आवडणार नाही! त्याचसोबत येथील उकडी मोदक प्रसिद्ध आहेत. (Konkan kandalvan Safari)

घुमेश्वर मंदिर

कुठे राहाल?

राहण्यासाठी रिसॉर्ट्स, निवासस्थाने, हॉटेल्स उपलब्ध आहेत.

आणखी काय काय पहाल ?

पेशवे स्मारक-पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या जन्मस्थळी पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे.
लक्ष्मी नारायण मंदिर- भगवान विष्णूचे हे मंदिर २०० वर्षे जुने असल्याचे म्हटले जाते.

दिवेआगर बीच

दिवेआगर बीच-

श्रीवर्धनपासून २३ किमी. अंतरावर हा स्वच्छ बीच आहे.

स्वयंभू घुमेश्वर मंदिर

स्वयंभू घुमेश्वर मंदिर –

घुम गावातील हे स्वयंभू घुमेश्वर मंदिर होय. काही प्राचीन मूर्ती इथे पाहायला मिळतात. श्रीवर्धनपासून अर्धा तासांच्या अंतरावर हे मंदिर आहे.

शिवशंकर मंदिर

श्री जिवनेश्वर मंदिर देवस्थान-

श्री जिवनेश्वर मंदिर पेशवेकालीन असून मंदिराचे सुबक बांधकाम आहे. हे मंदिर अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर आकर्षक आहे.

हरिहरेश्वर

हरिहरेश्वर –

येथे प्राचीन शिव मंदिर आहे. येथे श्री हरिहरेश्वरचे प्रसिद्ध मंदिर आहे. हरिहरेश्वरमध्ये एमटीडीसी रिसॉर्टदेखील आहेत. वर्षभर पर्यटनासाठी हे ठिकाण उपलब्ध आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड पाऊस असतो. तसेच काळभैरवाचे मंदिरही तुम्हाला पाहता येईल.

कसे जाल?

श्रीवर्धनपासून १ किमी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.

वेळास बीच-

वेळास बीच कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.

कसे जाल?

हरिहरेश्वरच्या दक्षिणेला १२ किमी. अंतरावर अंतरावर हे ठिकाण आहे.

आरवी बीच

आरवी बीच –

श्रीवर्धनजवळील आरवी समुद्रकिनारा हा सुंदर पांढऱ्या वाळूचा किनारा आहे.

कसे जाल?

श्रीवर्धनपासून १० किमी तर दिवेआगरपासून १२ किमी. अंतरावर हा किनारा आहे. हा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रजननाचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे डॉल्फिनही पाहता येतात.

आरवी बीचजवळ रिसॉर्ट्स आहेत. काही घरगुती निवास व्यवस्था आहे. तसेच या जवळ असणारे आडगाव बीच, शेखाडी बीच, कोंवील बीच, नानवली लाईट हाऊस पाहता येईल.

काळिंजे कांदळवन

कांदळवनांची अविस्मरणीय बोट सफर

अनेक समुद्रकिनाऱ्यांची फिरस्ती झाली असेल तर कोकणातील कांदळवनांची अद्भूत सफर करायलाच हवी राव! श्रीवर्धनमधील काळिंजे गावाला कांदळवनांचे अनोखे वैभव लाभले आहे. कोकण किनारपट्टीवरील हे छोटसं गाव आहे. एका बाजूला बेट आणि दुसऱ्या बाजूला कांदळवन असं निसर्गाचं देखणं रुप आपणास पाहायला मिळतं. शिवाय काळिंजे गावातील महिला गाईड म्हणून काम करतात. वनविभागाच्या कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनाचे उपक्रम येथे राबवले जाते. संवर्धन आणि संरक्षण करून रोजगारासाठी कांदळवनाची सफारी पुढे येतेय.

एकीकडे बेटाच्या स्वरुपात कांदळवन आणि दुसरीकडे बेटावंर नारळ, पोफळी, चिंच, इतर वनस्पती आहेत. गोड्या पाण्याची विहिरी, जुनी घरे पाहायला मिळतात. ११ प्रजातीचे कांदळवन आणि ५ प्रकारचे मँग्रुव्ह येथे सापडतात. मँग्रुव्ह वॉक, सफारी बोट हे गावातील लोकांचे उपजीविकेचं साधन बनले आहे.

श्रीवर्धन

तीवर, पिवळी डुंबी अशी झाडे येथे असून ती स्वत:चे रोपटं स्वत: तयार करतात. यास 'वॉकिंग ट्री' देखील म्हणतात. काळिंजे खाडीत ८५ पक्षांची प्रजाती आहेत. ब्लॅक कॅट किंग फिशरचे दर्शनही घेता येते. पानमांजराचे हक्काचे घर (उदमांजरे) म्हणजे कांदळवन होय. कांदळवनात खेकड्यांची पैदास चांगली होते. जमिनीची धूप होऊ नये म्हणून कांदळवनाचा उपयोग होतो.

श्रीवर्धनमध्ये आणखी काय पहाल?

श्री भैरवनाथ मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर गुडेघर, श्री बोरेश्वर महादेव मंदिर, काळेश्वरी मंदिर, श्रीवर्धन, घुमेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर, गणपती मंदिर, घुमेश्वर नदी (पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण), रानावली नावाचं ठिकाण, मदगड, कुसमेश्वर. (मदगड येथे शिवकालीन किल्ला आहे)

पर्यटनाची आवड असणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी श्रीवर्धनची सफर कायमची स्मरणात राहणारी ठरेल.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT