Latest

कोल्हापूर : कसबा बावडा ऑनर किलिंगप्रकरणी सख्ख्या भावांना आजन्म कारावास

अविनाश सुतार

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : बहिणीने केलेल्या आंतरजातीय विवाहाच्या रागात तिच्यासह तिच्या नवऱ्याचा खून झाला होता. ही घटना १६ डिसेंबर २०१५ रोजी कसबा बावडा येथील गणेश कॉलनीत घडली होती. याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना न्यायालयाने दोष ठरवत आज (दि.११) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी गणेश महेंद्र पाटील, जयदीप महेंद्र पाटील अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. १६ डिसेंबर २०१५ रोजी कसबा बावडा येथील गणेश कॉलनीत मेघा इंद्रजीत कुलकर्णी व इंद्रजीत श्रीकांत कुलकर्णी या दांपत्याचा खून करण्यात आला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी १६ साक्षीदार तपासले होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT