Latest

कोल्‍हापूर: दानोळीत सापडले एक फूट लांबीचे मगरीचे पिल्लू

अमृता चौगुले

दानोळी(कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : रिंगरोड परिसरातील जनावरांच्या गोठ्या शेजारील सांडपाण्याच्या डबक्यात एक फूट लांबीचे मगरीचे पिल्लू आढळून आले. गोठा मालक राजदीप थोरात यांनी पिल्लू पकडून वनविभागाच्या स्वाधिन केले.

रिंगरोड शेजारी राजदीप धनाजीराव थोरात यांचा जनावरांचा गोठा आहे. रात्री उशिरा त्यांना गोठ्या शेजारील सांडपाण्याच्या डबक्यातुन मगरीचे लहान पिल्लू बाहेर आलेले दिसले. त्यांनी अशोक दळवी, सोमनाथ मंडले, विजय साळोखे,सुरेश रजपुत, सुरज कोळी,रोहित हरळे, प्रदिप पाटील, नितीन सकपाळ यांच्या मदतीने हे पिल्लू पकडून वनविभागाला याची माहिती दिली. दरम्यान वनमजूर हरिभाऊ जाधव त्यांच्या ताब्यात हे पिल्लू देण्यात आले. जाधव यांनी हे पिल्लू नैसर्गिक अधिवासात सोडले.

गेल्या एक वर्षापूर्वी याच डबक्यात मोठी मगर आढळून आली होती. तेव्हा वनविभाग, ग्रामपंचायत व जयसिंगपूर येथील वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली होती पण मगर सापडली नाही. पण पुन्हा याच डबक्यात मगरीचे पिल्लू आढळून आल्याने शेजारील रहिवाशी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT