Latest

कोल्हापूर : शित्तूर वारूण-उदगिरी रस्त्यावर बिबट्यासह बछड्याचे दर्शन (Video)

अविनाश सुतार

शित्तूर-वारूण: पुढारी वृत्तसेवा: शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारूण-उदगिरी रोडवरील राघूच्या धनगर वाड्यानजीक मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज (दि. १९) सकाळी अकराच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले.

उदगिरीहून शित्तूरकडे येणाऱ्या समीर पुजारी, आनंदा पाटील, दिलीप पाटील या प्रवाशांना बिबट्या आपल्या बछड्यास जबड्यात घेऊन जात असताना दिसला. मानवी वस्तीशेजारी दिवसाढवळ्या बिबट्याच्या अशा खुलेआम वावरामुळे प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले आहे.

वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी वारंवार मागणी करूनदेखील वनविभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार नागरिकांतून होत आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT