Latest

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणूक- गावोगावी परडी, करणीची वर्णी; उमेदवार, मतदार भितीच्या छायेखाली

मोहन कारंडे

राशिवडे; प्रवीण ढोणे : निवडणूक कोणतीही असो करणी, भानामती, तंत्र-मंत्र, परडी हे ठरलेलंच असतं. काही लोक 'करणी'च्या माध्यमातून मतदारांना भिती घालत असतात. आता तर जिल्ह्यात ग्रा. पं. च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचे नारळ फुटल्यानंतर गावा-गावांत करणीचे प्रकार घडत आहेत. मतदानासाठी काही तास उरले असतानाच राधानगरी तालुक्यात करणीचे अघोरी उपाय केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

राधानगरी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक गावांमध्ये मतदारांना वश करण्यासाठी करणीचे उपाय केले जात आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्यात असे प्रकार घडणे निंदाजनक आहे. जादू, तंत्र-मंत्र, करणी हे थोतांड समजले जात असले तरी ग्रामीण भागामध्ये हे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटल्यानंतर प्रचारामध्ये रंगत येत आहे. प्रचारामध्ये मतदारांचा कल अस्पष्ट दिसत असला तरी यावर उपाययोजना म्हणून परडी, करणी, भानामती, काळी बाहूली, लिंबू आदी करणीचे प्रकार वाढले आहेत. हातात दोरा, गळ्यात ताईत, टाचण्या टोचलेला लिंबू गावांमध्ये तिकटीवर, गल्लीमध्ये टाकले जात आहेत. जादुटोण्याच्या नावाखाली लोकांच्या भावनेशी खेळण्याचाच प्रकार सुरू आहे. या प्रकारांमुळे जादूटोणा, करणीवाले महाराजांचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे उमेदवारांना निवडणुकीपेक्षा करणीची वर्णीच डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT