पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरात मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (NCS) माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती, या भूकंपाचा केंद्रबिंदू (Kolhapur Earthquake) जमिनीखाली 10 किमीवर होते. यामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही.
कोल्हापूरमधील भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे? याबाबत माहिती मिळालेली नाही. पण या भूकंपाने कोणतीही वित्त व जीवितहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहिनुसार जम्मू काश्मीरमध्येदेखील भूकंप झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहाटे ३ च्या सुमारस 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किमीवर होता. काबूलमध्ये (अफगाणिस्तान) देखील रात्री 2 च्या सुमारास 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला.
हेही वाचलंत का?