Latest

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक बाळ गायकवाड यांचे निधन

निलेश पोतदार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक व असंख्य कुस्तीगिराचे मार्गदर्शक वस्ताद बाळ तथा बाळासाहेब राजाराम गायकवाड (वय ९०) यांचे निधन झाले. गेल्या चार महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या मागे भाऊ, बहिणी, पुतणे, जावई सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सन १९६०च्या दरम्यान माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे व बाळ गायकवाड यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईयांच्या मार्गदर्शन व सहकार्याने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली. त्‍यांनी कुस्तीगीरांचे संघटन करून पैलवान आणि तालमींना कुस्ती पेशा वाढविण्यासाठी सहकार्य केले. आजही बाळ दादा हे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे चीफ पेट्रन म्हणून कार्यरत होते.

१९७० ते १९८५ सालापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असंख्य कुस्तीगरांच्या या संघटनेचा प्रचंड मोठा गोतावळा व आदर युक्त दबदबा होता. त्यांचे समवयस्क हिंदकेसरी गणपत आंदळकर 'मारुती माने यांनाही कुस्ती बाबत त्यांचे मार्गदर्शन असायचे. त्याचबरोबर हिंदकेसरी चंबा मुतनाळदादू चौगुले विष्णू जोशीलकर निग्रो बंधू यांच्यासह आज अखेरच्या अनेक नामांकित मल्लांना त्यांचे कुस्तीसाठी व्यायामापासून आहारापर्यंत सर्व मार्गदर्शन असायचे.

१९ ७७ च्या दरम्यान उत्तरे कडील विशेष करून गुरु हनुमान सिंग यांच्या पैलवानांचे कोल्हापूरकरांना कुस्तीसाठी वारंवार आव्हान असायचे. कोल्हापूरकरांच्या बरोबर बाळ दादांनाहीही ती मोठी बोचणी होती. म्हणून त्यांनी अतिशय लहान वयामध्ये कोपार्डे येथील लहान शाळकरी मुलगा युवराज पाटील यांना आणून आपल्या स्वतः बरोबर ठेवून भारताचा सर्वश्रेष्ठ मल्ल युवराज पाटील घडविला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT