Latest

कोल्हापूर : शिरटी येथील तंटामुक्त अध्यक्ष निवड सभा बरखास्त

अविनाश सुतार

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा : शिरटी (ता. शिरोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष निवडीची सभा ही निवड प्रकियेच्या गोंधळामुळे अखेर बरखास्त करण्यात आली. निवड प्रक्रिया कशी घ्यायची यावरून सत्ताधारी-विरोधकात शाब्दिक बाचाबाची झाली. सभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या बाजूने मोठी गर्दी झाल्यामुळे मतदार कसे मोजायचे, असा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. आणि त्यानंतर अध्यक्ष अनिता चौगुले यांनी सभा बरखास्त झाल्याचे जाहीर केले.

तंटामुक्त अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संतोष रायगोंडा पाटील आणि प्रमोद महाबळ पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. दोन्ही उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असल्याने निवड सभेवेळी अत्यंत चुरस दिसून आली. निवड प्रकिया कशी घ्यायची, असा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कोरमवर सह्या केलेल्या नागरिकांचे नाव पुकारात त्यांचा पाठिंबा कोणाला आहे. यावरून मतदान घ्यायला सुरवात केली. मात्र, काही ग्रामस्थांनी या प्रकियेला विरोध केल्यानंतर ही निवड सभा बरखास्त करण्यात आली. यावेळी भर उन्हात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT