कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बहिणीच्या पतीला अनुकंपा तत्त्वावरील नोकरीत सामावून घेत नसल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोरच एका तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. संतोष राजू कांबळे (वय 22, रा. डाळिंब दानोळी, ता. शिरोळ) असे तरूणाचे नाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर हा प्रकार घडल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
जिल्हाधिकाऱ्यांचे शिपाई आणि अंगरक्षक यांनी संतोषच्या हातातील रॉकेलचा कॅन काढून घेतला. यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
हेही वाचा :