Latest

कोल्‍हापूर : भरधाव कार ओढ्यात कोसळली; चालक, आई, बाळ सुखरूप

निलेश पोतदार

सरवडे: पुढारी वृत्‍तसेवा आकनूर-मांगोली (ता.राधानगरी) दरम्यान येथे सुझुकी बलेनो (एम एच ०९ एफ एन ५४९९) या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार पुलाजवळून दहा फूट खोल ओढ्यात पडली. नशीब बलवत्तर त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु कारचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळ व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, मांगोली येथील सुहास दत्तात्रय रानमाळे हे आपल्या बहिणीच्या बाळाला सरवडे येथे दवाखान्यात घेऊन गेले होते. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान परत येत असताना आकनूर येथील ओढ्याजवळ नवीन रस्ता तयार करण्यात येत असलेल्या खडीवरुन भरधाव सुझुकी बलेनो कारवरील सुहास रानमाळे यांचा ताबा सुटला. यामुळे कार रस्त्यापासून बाजुला खोल ओढ्यात दहा फूट खाली कोसळली.ओढ्यात कोसळलेल्या कारचा जोराचा आवाज ऐकून जवळच शेतात असणाऱ्या शेतकरी व रोडवरून जाणार्‍या लोकांनी आत अडकलेल्या सुहास रानमाळे, त्यांची बहीण व बाळाला काचा फोडून दरवाजा उघडला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले.

त्या तिघांचेही नशीब एवढे बलवत्तर होते की त्यांना कोणतीही इजा झाली नव्हती. थोड्यावेळाने क्रेनच्या सहाय्याने कार ओढ्यातून बाहेर काढण्यात आली. परंतु घटना समजताच आकनूर, मांगोली परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

रस्त्यावर पडलेली खडी अपघातास निमंत्रण

आकनूर-तुरंबे दरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर खडीचा थर टाकण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाल्यामुळे अनेकजणांच्या गाडीला सुसाट वेग आला आहे. सुसाट वेगामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही. या खडीवर जास्तीत जास्त रोलींग केले तर खडी मजबूत बसेल. परंतु हीच पसरलेली खडी अपघातास निमंत्रण देत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT