Latest

 Post Office Franchise : टपाल खात्याद्वारे व्यवसायाची संधी; ५ हजार रुपयांत लाखो कमवा; जाणून घ्या सविस्तर योजना

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : टपाल खात्यामुळे आपल्याला विविध सुविधा मिळत असतात. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अनेक सुविधांसह बॅंकिंग सुविधाही लोकांना मिळत आहेत. टपाल खात्याचे काम आता फक्त पत्र किंवा कागदपत्रे पोहोच करणे इतकेच मर्यादित राहिलेले नाही. भारतीय टपाल खाते हे जगातील सगळ्यात मोठे नेटवर्क आहे. भारतीय टपाल खाते बँकिंग सेक्टरशी जोडण्यात आल्यानंतर टपालच्या माध्यमातून बचत खात्यासह अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. टपालचे नेटवर्क आणखी वाढवण्यासाठी टपाल खात्याकडून व्यवसायाची संधी अत्यंत अल्प शुल्कात देण्यात येत आहे. अवघ्या ५ हजार रुपयांमध्ये तुम्ही टपाल खात्याची फ्रॅंचायजी घेऊ शकता आणि लोकांना सुविधा देऊन तुम्हीही घरबसल्या पेैसे मिळवू शकता. जाणून घ्या, पोस्ट ऑफिस फ्रॅंचायजी योजनेबद्दल. ( Post Office Franchise)

Post Office Franchise : टपाल खाते फ्रॅंचायजी योजना 

भारतीय टपाल खाते हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. सद्यस्थितीत भारतात जवळजवळ १.५५ लाख टपाल खाते आहेत. त्यापैकी ८९% टपाल खाते हे ग्रामीण भागात आहेत. एवढी टपाल खात्यांची एवढी संख्या असूनही अद्यापही बऱ्याच ठिकाणी टपाल खात्याची सुविधा पोहोचलेली नाही. त्यामुळे लोकांना दूरवर जावे लागते. लोकांची गैरसोय टाळावी म्हणून टपाल खात्याने फ्रॅंचायजी सुविधा योजना सुरु केली आहे. फ्रॅंचाइजी योजना टपाल कार्यालयांची मागणी कायम आहे. विशेषत: नव्याने विकसित होणाऱ्या शहरी भागात अधिक टपाल खाते उघडण्याची ग्राहकांकडून सतत मागणी होत आहे. ही मागणी आता फ्रँचायजीच्या माध्यमातून आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतल आहे. तसेच या माध्यमातून तरुणांना नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे.

टपाल खात्याची फ्रॅंचायजी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त ५००० रुपये लागणार आहेत. ५००० हजारांची गुतंवणूक करून तुम्ही टपाल खात्याची फ्रँचायजी घेऊ शकता. येथे आपल्याला दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुम्ही फ्रॅंचायजी आउटलेट सुरु करणे दुसरा म्हणजे टपाल खात्याचे एजंट बनणे. ज्या ठिकाणी टपाल खात्याची सुविधा नाही आणि तिथे मागणी आहे तर तिथे तुम्ही टपाल खात्याची फ्रँचायजी घेऊन टपाल खाते सुरु करु शकता. तिथे टपाल खाते एजंट म्हणून ग्रामीण आणि शहरी दोन्ही परिसरात पोस्ट तिकीट आणि स्टेशनरी विकू शकता.

फ्रॅंचायजी कोण घेऊ शकतो

तुम्हाला टपाल खाते सुरु करायचे आहे तर त्याला काही अटींची पूर्तता करावी लागेल. त्या अटी पुढीलप्रमाणे आहेत

१. टपाल खात्याची फ्रॅंचायजी कोणतीही भारतीय व्यक्ती  घेऊ शकतो

२. त्या व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत

३. त्या व्यक्तीने किमान आठवी पास असणे गरजेचं आहे

४. एक सुरक्षा म्हणून ५००० हजार रुपये भरणे गरजेचे आहे

 Post Office Franchise : फ्रॅंचायजी घेतली पुढे काय?

फ्रँचायजी घेतल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचे काम करता त्यानुसार तुम्हाला टपाल विभागाकडून कमिशन मिळेल. जर टपाल खाते तुमच्या परिसरात खूप दूर असेल आणि तिथल्या सेवांना मागणी असेल, तर तुम्ही कमिशनमधून दरमहा लाखोंची कमाई करू शकता. टपाल खाते फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्ही इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. अर्ज करण्याची लिंक वेबसाइटवर दिली आहे. लिंकवर क्लिक करून, तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता. यानंतर फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. ज्यांचे अर्ज निवडले आहेत त्यांच्याशी टपाल विभाग करार करेल. यानंतर, तुम्ही स्वत: लोकांना टपाल खात्याची सेवा देऊ शकता.

फ्रँचायजी आउटलेटद्वारे काय  केले जाऊ शकते?

  • स्टॅम्प आणि स्टेशनरीची विक्री
  • नोंदणीकृत लेख, स्पीड पोस्ट लेख, मनी ऑर्डर बुक करणे
  • पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) साठी एजंट म्हणून काम करणे आणि प्रीमियम संकलनासह विक्रीनंतरची सेवा प्रदान करणे
  • किरकोळ सेवा जसे की बिल/कर/दंड संकलन/विभागाच्या देयक सेवा
  • ई-गव्हर्नन्स आणि नागरिक केंद्रित सेवांची तरतूद सुलभ करणे
  • विभागाकडून भविष्यात त्याच्या आउटलेटद्वारे सुरू करण्यात येणारी कोणतीही अन्य सेवा

अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवरुन जावून माहिती घेवू शकताय

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT