Latest

Mumbai Local Mega Block : जाणून घ्या 27 तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान वाहतुकीचे पर्यायी मार्ग

backup backup

कर्नाक उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी शनिवारी रात्रीपासून २७ तासांचा मेगाब्लॉक,१,०९६ लोकल फेऱ्या रद्द,सीएसएमटी-भायखळा लोकल वाहतूक १७ तासांनी, तर सीएसएमटी – वडाळा लोकल २१ तासांनी सुरू होणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, Mumbai Local Mega Block : सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यानच्या १५४ वर्षे जुन्या धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचे तोडकाम अखेर आज शनिवार १९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. परिणामी सीएसएमटी ते भायखळा, वडाळा आणि मेल- एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते भायखळा रेल्वे वाहतूक १७ तासांनी, तर सीएसएमटी ते वडाळा लोकल २१ तासांनी पूर्ववत होणार आहे. त्यामुळे रविवारी मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच लोकल प्रवास करावा, अशी विनंती रेल्वेने प्रवाशांना केली आहे.

Mumbai Local Mega Block : एक हजार ९६ फेऱ्या रद्द

सीएसएमटी-भायखळा, वडाळादरम्यान लोकल धावणार नाहीत. दररोज धावणाऱ्या १ हजार ८१० लोकल फेऱ्यांपैकी रविवारी १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकांतून ठाणे, कल्याण तसेच कर्जत-कसारा या स्थानकांदरम्यान लोकल चालवण्यात येणार आहे. याशिवाय, हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान लोकल धावतील. परंतु त्यांची संख्या खूपच कमी असणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टतर्फे शनिवारी रात्री १०.३० पासून २० नोव्हेंबर रोजी पहाटे ६.३० पर्यंत ४७ जादा बस चालवण्यात येणार आहेत.

Mumbai Local Mega Block : मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

शनिवार-रविवारी अप आणि डाउन मार्गावरील ३६ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. यात मुंबई-पुणे मार्गांवरील इंटरसीटी, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक- स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन यांसह अन्य गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय ६८ मेल एक्स्प्रेसला दादर, पनवेल पणे आणि नाशिक या स्थानकातच शेवटचा थांबा दिला असून येथून काही लांब पल्ल्याच्या गाड्या या तिथूनच सुटणार आहेत. रद्द केलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांचा परतावा प्रवाशांना देण्यासाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या उघडण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

१८६८ साली बांधलेला कर्नाक उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. कर्नाक उड्डाणपुलाला तडे गेले असून पुलाचा पायाही खराब झाला आहे.. त्याच्या खांबानाही तडे आहेत. हा पूल २२ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर २ सप्टेंबरपासून रेल्वे हद्दीतील किरकोळ पाडकाम सुरू झाले. २७ तासांच्या ब्लॉकमध्ये कर्नाक उड्डाणपुलाचा रेल्वे रुळावरील गर्डर हरवण्यात येणार आहे.

Mumbai Local Mega Block : शनिवारी सीएसएमटीहून डाउन दिशेला शेवटची लोकल 

• शेवटची धीमी लोकल रात्री १०.२८ खोपोली दक्षिण मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नाही.

• शेवटची जलद लोकल रात्री ९.५८ खोपोली

• शेवटची बांद्रा लोकल रात्री १०.३८ शेवटची पनवेल लोकल रात्री १०.३४

• सीएसएमटी-भायखळा १७ तासांचा ब्लॉक – शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत

• सीएसएमटी-वडाळा २१ तासांचा ब्लॉक – शनिवारी

• कोचिंग यार्ड २७ तासांचा ब्लॉक – शनिवारी रात्री ११ ते सोमवारी पहाटे २ वाजेपर्यंत

Mumbai Local Mega Block : परेवर नो ब्लॉक

मध्य रेल्वेवर २७ तासांच्या दक्षिण मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नाही.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT