Latest

Minakshi Rathod : सुख म्हणजे नक्की काय असतं फेम ‘देवकी’विषयी माहितीये का?

स्वालिया न. शिकलगार

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढतीय. या मालिकेतील कलाकार, त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तुम्हाला माहिती आहे का? या मालिकेत देवकीची भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Minakshi Rathod) हिने साकारलीय. यामध्ये मीनाक्षी राठोड हिची विनोदी भूमिका आहे. पण, खरंतरं, ही भूमिका खलनायिकेसारखी आहे. पण, मीनाक्षी (Minakshi Rathod) हिने आपल्या अभिनयात वेगळेपण आणलं.

देवकी मुळची जालन्याची आहे. तिला बालपणापासून अभिनयाची आवड आहे. तिच्या अभिनयाची सुरूवात शाळेपासून झाली. तिच्या वडिलांनाही अभिनयाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी देवकीला अभिनय, नृत्य, नाटक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले.

तिला तिच्या घरातील मिनू म्हणून बोलावतात. तिचा वाढदिवस १७ मार्चला असतो. गंगाराम वाडी, अंबड जालना येथे तिचा जन्म झाला.

जालन्यातील गंगाराम वाडी, अंबड येथील शाळेतून तिने शिक्षण घेतले. करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ येथून तिने पुढील शिक्षण घेतले. तिला 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली. तिने मयत, कमरबंद, सायकल यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

तिने २०१८ मध्ये मराठी मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधून टीव्ही विश्वात पदार्पण केले. २०२० मध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मिळाली. यामध्ये तिची देवकी उदय शिर्के पाटील ही व्यक्तीरेखा आहे.

राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी

तिने अनेक लघुपटांमध्ये काम केलंय. तिचा 'खिसा' लघुपट गाजला. खिसाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

पती आहे अभिनेता

देवकीचा पती कैलाश वाघमारे हादेखील एक अभिनेता आहे. दोघेही कॉलेजमध्ये असताना अभिनय करत होते. तेथूनचं दोघांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.

SCROLL FOR NEXT