Latest

KL Rahul IPL 2022 : विराट, रोहितच्‍या यादीत आता केएल राहुल, अशी कामगिरी करणारा पाचवा भारतीय फलंदाज

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गेली एक वर्ष टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करणारा फलंदाज केएल राहुल याने यंदाच्‍या आयपीएलमध्‍येही धमाकेदार सुरुवात केली आहे. सोमवारी त्‍याने सनराइजर्स हैदराबाद संघाविरोधात अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीमुळे आतात्‍याच्‍या नावावर एका विक्रमाची नोंद झाली असून, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, कर्णधार रोहित शर्माच्‍या यादीत त्‍याच्‍या नावे आले आहे. ( KL Rahul IPL 2022 )

मागील आयपीएल स्‍पर्धेतही केएल राहुल याने आश्‍वासक कामगिरी केली होती. मागील काही दिवस त्‍याने आपल्‍या खेळीत दाखवलेले सातत्‍यामुळे क्रीडा समीक्षकांकडूनही त्‍याचे कौतुक होत आहे. यंदाचा आयपीएलमध्‍येही त्‍याची कामगिरी सरस ठरत आहे. सोमवारी त्‍याने सनराइजर्स हैदराबाद संघाविरुद्धच्‍या सामन्‍यात अर्धशतकी खेळी केली. ही कामगिरी करत केएल राहुल याने टी-२० क्रिकेटमध्‍ये अर्धशतक खेळीचे अर्धशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणार तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

टी-20 क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक अर्धशतके करणारे भारतीय खेळाडू

खेळाडू               सामने                 अर्धशतकी खेळी
विराट कोहली       ३२८                  ७६
रोहित शर्मा           ३७२                   ६९
शिखर धवन          ३०५                    ६३
सुरेश रैना             ३३६                      ५३
केएल राहुल          १७५                    ५०

KL Rahul IPL 2022 केएल राहुलच्‍या खेळीने लखनौ सुपर जायंटसला तारले

लखनौ सुपर जायंटसने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकात तीन फलंदाज गमावले. यानंतर कर्णधार केएल राहुलने ५० चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार फटकावत ६८ धावांची दमदार खेळी केली. केएल राहूल आणि दीपक हुडाच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि युवा फलंदाज आयुष बडोनी याने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या फलंदाजीच्या बळावर लखनौ सुपर जायंटसला १६९ धावसंख्या गाठता आली.

लखनौने दिलेले आव्‍हान हैदराबाद सहज पार करेल, असे परिस्‍थिती असतानाच गोलंदाज आवेश खान याने टाकलेले १८ व्या षटकाने सामन्याचा निकाल बदलला. निकोलस पुरन आणि वॉशिंग्टन सुंदर यांची जोडी जमलेली असताना आवेश खानने निकोलस पुरन आणि त्याच्या नंतर आलेल्या अब्दुल समदला पाठोपाठ बाद करुन सामना लखनौच्या पारड्यात झुकवला. अखेर सुंदरला काही करता आले नाही. शेवटच्या षटकात जेसन होल्डर याने तीन वीकेट घेत लखनौचा विजय निश्चित केला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT