Latest

Kinetic e Luna : ‘कायनेटिक’ची लुना बाजारात आली पुन्हा!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : कायनेटिक ग्रुपच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाने त्यांच्या आगामी नवी इलेक्ट्रिक दुचाकी पुन्हा लुना नावानेच बाजारात आणली आहे. ८०च्‍या दशकात सायकलचे पुढचे रुप म्हणजे लुना असं म्हटलं जात होतं. लुना ही 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत भारतीय गावांमध्ये आणि शहरांमध्ये लोकप्रिय मोपेड होती. यानंतरच्‍या काळात बाईक आणि स्कूटरच्‍या बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आणि लुना विस्मृतीत गेली. कंपनीने २००० च्या दशकाच्या सुरुवातीस त्याचे उत्पादन थांबवले. आता लुना नव्या रूपात बाजारात आली आहे तीही इलेक्ट्रिक अवतारात.

आगामी Kinetic e Luna ची सध्याच्या मार्केटमध्ये असलेल्या अनेक इलेक्ट्रिक दुचाकींशी स्‍पर्धा असेल. पेट्रोलवर चालणार्‍या लुनाप्रमाणेच, ई लूना ऑफरोडसाठीही फायदेशीर आहे. कायनेटिक ग्रीन हे 'लुना' नावाच्या ब्रँडने लोकांना आकर्षित करत आहे. ईव्ही मार्केटमध्ये आता लुना चर्चेत असणार आहे.

Kinetic E Luna चे फीचर्स

Kinetic E Luna मध्ये ११० किमी रेंज दिला आहे. तसेच तिची बॉडी पूर्णपणे मेटलमध्ये बनवली गेली आहे.  स्पीडोमीटर तसेच ओडोमीटर हे डिजीटल स्‍वरूपात देण्यात आले आहे. ई लूनामध्ये दोन सीट्स देण्यात आल्‍या आहेत. हेटलाईट्सचे डिझाईनही आकर्षक करण्यात आले आहे. एकुणच लुना पुन्हा एकदा बाजारात अवतरणार असली तरी ग्राहकांच्या पसंतीस उतरण्‍यासाठी सध्याच्या बाजारात असलेल्‍या इतर ई बाईक्‍सनाही लुनाला टक्‍कर द्यावी लागणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT