Latest

Shraddha Walker Murder Case : ‘सोडून जाण्याची धमकी दिली म्हणून श्रद्धाचा खून केला’ – आफताब

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोडून जाण्याची धमकी दिली म्हणून श्रद्धाचा खून केला, असा कबुली जबाब आफताब पुनावाला याने नार्को चाचणीवेळी दिली आहे. नार्को चाचणीत पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आफताबने खून कसा केला, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे कसे केले याचीही माहिती पोलिसांना दिली आहे. (Killed Shraddha when she threatened to leave)

श्रद्धा वालकरचा खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याच्या आरोपाखाली आफताब अटकेत आहे. आफताब पोलिस कोठडीत असून त्याची नार्को चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

घरखर्चावरून श्रद्धासोबत होत होते वाद

श्रद्धा आणि आफताब लिव्ह इनमध्ये राहात होते. श्रद्धाचा खून रागाच्या भरात केला, त्यानंतर करवत आणि चाकूच्या मदतीने तिच्या शरीराचे तुकडे करून ते दक्षिण दिल्लीत असलेल्या जंगलात टाकले अशी माहिती त्याने दिली आहे.

आफताबने नार्को चाचणीत काय माहिती दिली, याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
"घरखर्चावरून आमच्या वाद होत होते," असे आफताबने चाचणी दरम्यान सांगितले आहे.

श्रद्धाच्या शरीराचे तुकडे आणि हत्यारे शोधण्यासाठी पुन्हा तपास

नार्को चाचणीनंतर संशयिताची पुन्हा चौकशी केली जाते. ही चौकशी फॉरेन्सिकचे अधिकारी आणि तपास आधिकारी शुक्रवारी दुपारी करणार आहेत.
आफताबने नार्को चाचणीत दिलेल्या माहितीनुसार पोलिस गुरुग्राम आणि दिल्ली परिसरात पुन्हा नव्याने तपासणी करणार आहेत. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे आणि गुन्ह्यातील हत्यारे शोधण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT