Latest

Kiara Advani-Sidharth : सिद्धार्थ-कियाराची न्यू इअरसाठी तयारी? रोमँटिक अंदाजात स्पॉट (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि पती, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलिवूडमधील सर्वात लाडके कपल आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला फेबुवारी महिन्यात राजस्थानमध्ये दोघांचे मोठ्या उत्साहात लग्न सोहळा पार पडला होता. लग्नानंतर अनेकवेळा सिद्धार्थने कियारावर किस करत प्रेमाचा वर्षाव केलाय. दरम्यान नुकतेच काल ख्रिसमसच्या मुहूर्तावर कियाराने सिद्धार्थसोबत रोमँटिक होत दिमाखात ख्रिसमसचे सेलिब्रेशन केलं आहे. या फोटोत सिद्धार्थने कियारा किस केलं आहे. यानंतर दोघां कपलचा फोटो खूपच व्हायरल झाला. आता ख्रिसमसनंतर हे कपल ( Kiara Advani-Sidharth ) येणाऱ्या नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

संबंधित बातम्या 

कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राने ( Kiara Advani-Sidharth ) काल सोमवारी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानंतर सोमवारी रात्रीच सिद्धार्थ आणि कियारा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. यामुळे ख्रिसमसनंतर येणाऱ्या नव वर्षाच्या स्वागतासाठी देश सोडून हे कपल बाहेरील देशात गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोघेजण २०२४ या नव वर्षाचे स्वागतासाठी गेले आहेत की, काही कामासंदर्भात गेले आहेत याबाबतची अधिकृत्त माहिती मिळालेली नाही.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कियारा आणि सिद्धार्थ ​​विमानतळाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. यावेळी दोघेजण कॅज्युअल लूकमध्ये ग्लॅमरस दिसले. कियाराने मॅचिंग पायजामासह पांढरा स्वेटशर्ट परिधान केला होता. तर सिद्धार्थ मॅचिंग पायजमासह काळ्या आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये हॅडसम दिसत होता. हा व्हिडिओ मानव मंगलानी यांच्या इंन्स्टाग्रावर व्हायरल झाला आहे.

कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला होते. या शेअर केलेल्या फोटोत कियाराने सिद्धार्थला हग केलं आहे. त्याचवेळी सिद्धार्थने कियाराला किस केलं आहे. यादरम्यान कियारा लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसली. तर, सिद्धार्थ लाल पँट आणि काळ्या शर्टमध्ये हॅडसम दिसला. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाला जवळपास दहा महिने झाले आहेत.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटात दिसली होती. याशिवाय कियारा आगामी 'गेम चेंजर' चित्रपटात अभिनेता राम चरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. कियारा 'डॉन ३' मध्येही दिसणार आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

तर सिद्धार्थ निर्माता ​​करण जोहरच्या 'योद्धा' चित्रपटाच्या तयारीत आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरीजमध्ये सिद्धार्थसोबत शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांनी मुख्य भूमिका साकरल्या आहेत.

( video : manav.manglani instagram वरून साभार)

SCROLL FOR NEXT