Latest

संतापजनक…खलिस्‍तान समर्थकांच्‍या टार्गेटवर पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांची मुले! मुलीला शिवीगाळ

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत सरकारविरोधात विदेशात निदर्शने करणार्‍या खलिस्‍तान समर्थकांनी अमेरिकेत एक लज्‍जास्‍पद प्रकार केला आहे. खलिस्‍तान समर्थकांनी पंजाबचे मुख्‍यमंत्री भगवंत मान ( Punjab CM Bhagwant Mann ) यांच्‍या मुलांना टार्गेट करणे सुरु केले आहे. त्‍यांनी मान यांची कन्‍या सीरत कौर हिला फोनवर धमकी देत शिवीगाळ केली आहे, असा खुलासा भगवंत मान यांच्‍या अमेरिकेत वास्‍तव्‍यास असणार्‍या घटस्‍फोटित पत्‍नी इंदरप्रीत कौर यांनी फेसबूकच्‍या माध्‍यमातून दिली आहे.

धक्‍कादायक…. मुलांना घेराव घालण्‍याचा अमेरिकेतील गुरुद्वारामध्‍ये ठराव

पटियाला येथील एका वकिलांनी त्यांच्‍या फेसबुक अकाऊंटवर सीरत कौर हिला खलिस्तान समर्थकांकडून धमकावले जात असल्याची पोस्ट शेअर केली आहे. भगवंत मान यांच्या पत्नी इंदरप्रीत कौर यांनी खुलासा केला की, भगवंत मान यांच्या दोन्ही मुलांना घेराव घालण्याचा ठराव, अमेरिकेतील गुरुद्वारामध्ये झाला आहे.

इंदरप्रीत कौर या मान यांच्‍या पहिल्‍या पत्‍नी आहेत. त्‍यांचा घटस्‍फोट झाला आहे. मुलगी सीरत कौर मान आणि मुलगा दिलशान मान यांच्‍यासह त्‍या अमेरिकेमध्‍ये राहतात. दोन्‍ही मुले १६ मार्च २०२२ रोजी पंजाब मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती.

पंजाब पोलिस खलिस्‍तान समर्थक अमृतपाल सिंग याच्‍या मागावर आहेत. मागील १२ दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत आहे. याच्‍याविरोधात केलेल्‍या कारवाईनंतर विदेशात असलेले खलिस्‍तान समर्थक बिथरले आहेत. ते भारत सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. या कृत्‍याचा पंजाबमध्‍येही निषेध होत आहे. आता अमेरिकेतील खलिस्‍तानी समर्थकांनी थेट पंजाबचे मुख्‍यमंत्री भंगवत मान यांच्‍या मुलांनाच टार्गेट केल्‍याने संताप व्‍यक्‍त केला जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT