Latest

South Star Yash : KGF स्टार यशने किराणा दुकानात खरेदी केली टॉफी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार यश ( South Star Yash )  सध्या खूपच चर्चेत असतो. नुकतेच यशला एका किराणा दुकानात स्पॉट करण्यात आले आहे. सध्या यशचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये केवळ यशच नाही, तर त्याची पत्नीही दिसत आहे.

संबंधित बातम्या 

यश ( South Star Yash ) गडगंज श्रीमंतही आहे, तरीही तो खूपच साधे आयुष्य जगतो. त्याचा साधा स्वभाव चाहत्यांनाही खूप आवडतो. केजीएफस्टार यश किराणा दुकानात खरेदी करताना दिसत आहे. चाहत्यांकडून यशच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

आतापर्यंत कोणीही सेलिब्रिटीला किराणा दुकानात खरेदी करताना पाहिले नसेल; पण यश कायम किराणा दुकानातून खरेदी करतो. आता यश एक टॉफी खरेदी करण्यासाठी दुकानात पोहोचला होता. यशला किराणा दुकानात पाहिल्यानंतर चाहत्यांनाही आनंद झाला.

SCROLL FOR NEXT