Latest

Kerala Film Director Ramasimhan Aboobakker : मल्याळी चित्रपट दिग्दर्शकाने भाजपला ठोकला राम राम! म्हणाले तरीही मी मोदींसोबतच

अमृता चौगुले

तिरुअनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : मल्याळम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि संघ परिवाराशी संलग्न रामसिम्हन अबुबकर यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडण्याची घोषणा केली आहे. रामसिम्हन यांनी डिसेंबर २०२१ मध्ये इस्लामचा त्याग केला होता आणि अली अकबर हे नाव बदलून रामसिम्हन अबुबकर केले होते. (Kerala Film Director Ramasimhan Aboobakker)

रामसिम्हन हे भाजपच्या राज्य समितीचे सदस्य होते. पण २०२१ मध्ये त्यांनी सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्यांचा त्याग केला होता. 'पुझा मुतल पुझावरे' चित्रपटाचे दिग्दर्शक अबुबकर यांनी सांगितले की, मी कुठेही जात नसल्याने माझ्या निर्णयावर जास्त चिंता करणनयाची गरज नाही. तो फक्त त्या 'धर्म' (सनातन धर्माचे) सोबत राहिन व त्याचे पालन करेन ज्याची शिकवन मी घेतलेली आहे.

'…म्हणून बंध तुटले' (Kerala Film Director Ramasimhan Aboobakker)

रामसिम्हन यांनी गुरुवारी (१५ जून) आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, "सर्व गोष्टींपासून मुक्त. फक्त – धर्मासोबत." गेल्या दोन आठवड्यांत केरळमध्ये भाजप सोडणारे अबुबकर हे तिसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी मल्याळम दिग्दर्शक राजसेनन आणि अभिनेता भीमन रघु यांनी भाजप सोडून मार्क्सवादी पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती.

सर्व पदांचा राजीनामा दिला

ऑक्टोबर 2021 मध्ये, दिग्दर्शक-राजकारणी-चित्रपट निर्माते रामसिम्हन यांनी राज्य समिती सदस्यासह भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. कारण केरळमधील एका मुस्लिम भाजप नेत्याविरुद्ध केरळ युनिटच्या संघटनात्मक पातळीवरील कारवाईमुळे ते वाईट वाटले होते. भाजपचाच सदस्य राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये, चित्रपट निर्मात्याने म्हटले होते की भाजपसोबत काम करताना मुस्लिम व्यक्तीला त्याच्या कुटुंबाकडून आणि समुदायाकडून कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो हे सामान्य माणसाला समजणे कठीण आहे. या घडामोडींवर भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT