Latest

कॅटरिना कैफच्या ‘त्या’ ड्रेसअपने प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला उधाण !

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुंदर कॅटरीना कैफ नुकतीच एका विमानतळावर देसी लुकमध्ये दिसली. तिने सुंदर दुपट्टासोबत एक कुर्ता-पलाजो पँट घातली होती. नेटिझन्ससह अनेकांनी तर्कदेखील लावला की, ती प्रेग्नेंट आहे. विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले आहेत.

तिच हे पोटो आणि व्हिडिओ पाहून अनेकांनी म्हटलं की, कॅटरीना प्रेग्नेंट आहे. देसी अवतारात ती खूप सुंदर दिसतेय. अभिनेत्री कॅटचा नवा लुक पाहून नेटिझन्स सोशल मीडियावर चर्चा करताना दिसताहेत. कॅटरीना-विक्की कौशलने ९ डिसेंबर, २०२१ को राजस्थानातील बरवाडा येथील सिक्स सेंस फोर्टमध्ये लग्न केले होते.

कॅट दिसणार या चित्रपटात

कॅटरीना सलमान खान स्टारर थ्रिलर चित्रपट 'टायगर ३' मध्ये दिसणार आहे, जो या वर्षी मोठ्या ईदला रिलीज होणार आहे. २१ एप्रिल, २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनुक्रमे हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'टायगर ३' हा मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. टायगर ३ मध्‍ये इमरान हाश्मी देखील आहे. तो कॅटसोबतचा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. कॅटरीना फोन भूत, जी ले जरा आणि श्रीराम राघवनच्या मेरी ख्रिसमसमध्ये प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

(viralbhayani insta video) 

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT