Latest

काश्मीर : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; मुलगीही जखमी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. श्रीनगर जिल्ह्यातील सूरा परिसरात हा हल्ला करण्यात आला. या गोळीबारामध्ये पोलीस कर्मचारी सैफुल्लाह कादरी गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी जखमी झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांची या घटनेची पुष्टी केलेली आहे.

पोलीस सुत्रांनुसार समोर आलेली माहिती अशी की, सैफुल्लाह कादरी यांनी रुग्णालयात मृत घोषीत करण्यात आले. डाॅ. जी. एच. यातू म्हणाले की, रुग्णालयात आणताच सैफुल्लाह यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांच्या मुलीची तब्येत स्थिर आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी केलेली असून दहशहतवाद्यांचा वेगाने शोध सुरू आहे.

एकंदरीत मागील काही महिन्यांमध्ये दहशतवाद्यांनी स्थानिक जवानांना, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अल्पसंख्याक समुदायच्या लोकांवर हल्ले केलेले आहेत. इतकंच नाही तर दुसऱ्या राज्यातून आलेल्या प्रवाशांवरही हल्ले करण्यात आलेले आहेत. सुरक्षा दलाच्या 'ऑपरेशन ऑल आऊट'मुळे हे दहशतवादी खवळलेले आहेत. त्यातून लोकांच्यात दहशत बसावी, यासाठी ते असे हल्ले करत आहेत. काश्मिरी पंडितांची वापसीचे प्रयत्न, स्थानिक निवडणुकांमध्ये लोकांचा सहभाग या मुद्द्यांवर हे दहशतवादी खवळलेले आहेत.

पहा व्हिडीओ : दुचाकींचे 'भारत स्टेज ६' तंत्रज्ञान पर्यावरणपूरक : प्रा.पाटणकर | प्रयोग सोशल फाऊंडेशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT