Latest

करणी सेना प्रमुखांच्‍या हत्‍येतील आरोपीच्‍या घरावर जयपूर महापालिकीने फिरवला बुलडोझर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी (Karni Sena chief Murder case) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेल्या रोहित राठोड याचे घर जयपूर ग्रेटर महापालिकेने आज (दि.२८) बुलडोझरने जमीनदाेस्‍त केले.  (Bulldozer action) राठोड याचे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते, असे मनपा सूत्रांनी यापूर्वी स्‍पष्‍ट केले  हाेते.

रोहित राठोड हा सुखदेव सिंह गोगामेडी यांच्‍यावर गोळीबार करणार्‍या आरोपींपैकी एक आहे. त्‍याचे जयपूरमधील खातीपुरा परिसरात घर होते. ते बेकायदाशीरपणे बांधण्‍यात आले होते, असे महानगरपालिकेने स्‍पष्‍ट केले. यानंतर आज (दि.२८) त्‍याचे घर महापालिका अधिकार्‍यांनी जमीनदोस्‍त केले. ( Karni Sena chief Murder case )

करणी सेनेच्या प्रमुख गोगामेडी यांच्‍यावर ५ डिसेंबर रोजी जयपूरमधील त्यांच्या घरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. गोळीबारातील आरोपी रोहित राठोड आणि नितीन फौजी त्यांच्या एका साथीदारासह चौघांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाईत 9 डिसेंबर रोजी चंदीगडमध्ये अटक केली होती.

गोगामेडी यांची हत्‍या झाल्‍यानंतर फेसबुक पोस्ट करत, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेला गँगस्टर रोहित गोदारा याने हत्येची जबाबदारी स्‍वीकारली होती. जमीनच्‍या वादातून हा प्रकार घडल्‍याचा दावा करण्‍यात आला हाेता. या प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर नितीन फौजी याने रोहित गोदरा आणि त्याचा जवळचा साथीदार वीरेंद्र चरण यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली होती.

आज आरोपी रोहित राठोड याचे बेकायदा बांधण्‍यात आलेले घर जयपूर महापालिकेने बुलडाेझरने जमीनदाेस्‍त केले. ​या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस सूत्रांनी सांगितले की, "रोहित राठोड याचे घर रस्त्याच्या मधोमध एक बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते, त्यामुळे तो भाग पाडण्याचे आदेश जारी करण्यात आले होते."

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT