Latest

HBD Kareena Kapoor : अर्ध्या रात्री करीनाची पार्टी, बहिणीसोबत धमाल अन्‌

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : २१ सप्टेंबर रोजी करीना कपूर खान आपला ४३ वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. करीनाने अर्ध्या रात्री बहिण करिश्मा कपूर आणि मित्र परिवारासोबत आपला स्पेशल दिवस साजरा केला. (HBD Kareena Kapoor ) करिश्माने पार्टीचे काही फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये बर्थडे गर्ल करीना नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. तर करिश्मा पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. (HBD Kareena Kapoor)

करीनाच्या बर्थडेला दोघी बहिणींनी फोटोसाठी अनेक पोझ दिले. दोन्ही बहिणींचा बॉन्ड आज खूप वर्षांनंतर एकदम दृढ आहे. बेबो आणि लोलो बॉलीवूडच्या बेस्ट सिस्टर्सपैकी एक आहेत. करीना कपूरने आपल्या ४३ व्या जन्मदिनी केक कापला आणि तिचे सेलिब्रेशनचे लोकेशन पाहण्यासारखे आहेत.

करीनाच्या बर्थडे केकवर काय लिहिलं?

करिश्माने बेबोच्या जन्मदिनी केकचा एक फोटो पोस्ट केला होता. या केकवर 'जाने जान' असे लिहिले होते. करिश्मा कपूरने त्या लोकेशनची एक झलकदेखील दाखवली. येथे सर्वांनी मिळून बेबोचा खास बर्थडे साजरा केला.

करीना कपूरचा नवा चित्रपट

करीना कपूर आपला पहिला ओटीटी चित्रपट 'जाने जान'च्या रिलीजच्या तयारीत आहेत. करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नोट लिहिली. कोलाज व्हिडिओमध्ये, बेबोने चित्रपटाचे काही बीटीएस क्षण शेअर केले. यामध्ये जयदीप अहलावत, विजय वर्मा सोबत ती पोज देताना दिसत आहेत. सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जेहचे काही फोटो शेअर केले. फोटो शेअर केल्यानंतर फॅन्सच्या कमेंट सेक्शन बॉक्स भरला आहे.

कसा आहे 'जाने जान'चा ट्रेलर?

'जाने जान'चा ट्रेलर देवदारच्या झाडांनी वेढलेल्या कलिम्पोंगमध्ये होणाऱ्या सर्व रहस्यमयी घटनांची एक झलक दाखवतो. माया (करीना कपूर खान), नरेन (जयदीप अहलावत) आणि करण (विजय वर्मा) एका विचित्र कथेतून प्रवास करतात. 'जाने जान' २१ सप्टेंबरला ओटीटीवर रिलीज झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT