Latest

Kantara 2: ‘कंतारा २’ येणार भेटीला, जूनमध्ये शूटिंग होणार सुरु?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ मध्ये कन्नड भाषेतील प्रेक्षकांवर रुंजी घालून गेला. (Kantara 2) या चित्रपटाचे समीक्षकांकडून खूप कौतुकही झाले. कंताराला इतकं प्रेम मिळालं की, यानंतर कंतारा २ येणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मेगाहिट चित्रपट कंताराच्या निर्मितीमध्ये प्रोडक्शन कंपनी होम्बले फिल्म्सने पुष्टी केली आहे. आता कंतारा २ येणार, अशी माहिती समोर आलीय. (Kantara 2)

कंताराचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी आधीपासून चित्रपटाचे स्क्रिप्टिंग करत आहेत. आता प्रेक्षकांना ब्लॉकबस्टर चित्रपटाचा प्रीक्वल मिळेल. ऋषभ शेट्टी स्टारर २०२२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट कंताराने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता कंतारा २ च्या शोधासाठी दिग्दर्शक कर्नाटकात पोहोचले आहेत.

SCROLL FOR NEXT