Latest

Tejas Release Date : कंगना राणौतच्या ‘तेजस’ची प्रतीक्षा संपली, ‘या’दिवशी भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना राणौत स्टारर 'तेजस' दीर्घ प्रतीक्षेनंतर चित्रपटगृहात रिलीज होण्यास सज्ज आहे. 'तेजस'ची रिलीज डेट समोर आली आहे. (Tejas Release Date) चित्रपट रोनी स्क्रूवालाचे प्रोडक्शन हाऊस आरएसवीपी बॅनर अंतर्गत रिलीज होतोय. कंगना मुख्य भूमिकेत असून ती एका एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसेल. (Tejas Release Date)

सोशल मीडियावर घोषणा

'तेजस' बद्दल कंगना राणौतने सोशल मीडियावर घोषणा केली की, हा चित्रपट २० आक्टोबर रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज होईल. कंगनाने या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर करत रिलीज डेटची घोषणा केलीय. पहिल्या पोस्टरमध्ये ती एक फायटर प्लेनच्या समोर पायलटच्या युनिफॉर्ममध्ये दिसतेय. दुसऱ्या पोस्टरमध्ये ती लष्कराच्या गाडी समोर उभारलेली दिसते. या गाडीला आग लागलेली दिसते.

काय म्हणाली कंगना?

या पोस्टर्ससोबत कंगना राणौतने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आमच्या वीर वायु सेना पायलटांच्या शौर्याचा सन्मान! तेजस, २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल."

या चित्रपटाची कहाणी एअरफोर्स पायलट तेजस गिलची असाधारण यात्राच्या अवतीभोवती फिरते. सर्वेश मेवाडा द्वारा लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट २० ऑक्टोबर, २०२३ रोजी रिलीज होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT