Latest

कांदळी : चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा खून

backup backup

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील नगदवाडी जवळील कांदळी शिंदे मळा याठिकाणी चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

संध्या सुरेश शिंदे (वय-५१) असे खून झालेल्या व्यक्तीचे आहे. सुरेश दगडू शिंदे (वय-५९, रा. शिंदे मळा नगदवाडी कांदळी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या बाबतची फिर्याद सुशांत सुरेश शिंदे (वय-३१, रा. शिंदे मळा नगदवाडी कांदळी) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश याला पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय होता व यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे होत होती. १ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. आरोपी सुरेश यांनी मद्यप्राशन केले होते व त्यात त्याने चारित्र्याचा संशयाचा राग मनात धरून पत्नी संध्याचा हाताने गळा दाबून खून केला.

खून केल्यानंतर आरोपी सुरेश नारायणगाव येथे येऊन एका ठिकाणी बसला होता. पोलिसांनी त्याचा तपास लावून ताब्यात घेतले व माहिती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सनील धनवे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT