Latest

Kajal Aggrawal: काजल अग्रवालने प्रेग्नेंसीत फिट राहण्यासाठी दिल्या टिप्स (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggrawal) आई होणार आहे. ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. आता काजल अग्रवाल (Kajal Aggrawal) प्रेग्नेंसीतील प्रवास एन्जॉय करत आहे. काजलने बेबी बंपसोबत सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने जिमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रेग्नेंसी दरम्यान वर्कआऊट करताना दिसत आहे.

काजलने इन्स्टाग्रामवर एक्सरसाईजचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने लिहिलंय की, मी नेहमी खूप सक्रिय राहिली आहे. मी संपूर्ण आयुष्य वर्कआउट केलं आहे. गर्भवती महिला ज्यांना अन्य कुठलीही समस्या नाही, त्यांनी गर्भावस्थावेळी एरोबिक आणि स्ट्रेंथ कंपडीशनिंग एक्सरसाईजसाठी प्रोत्साहन द्यायला हवं.

अभिनेत्रीने प्रेग्नेंसीतील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्याकडून भरभरून प्रेम आणि कमेंट्स येत आहेत. काजलने इन्स्टाग्रामवर लाल साडीत फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. तिने फोटोखाली कॅप्शन दिलीय -'मॉमी ट्रेनिंग'.

काजलने कॅप्शनच्या माध्यमातून आई होण्याचा सुंदर अनुभव आणि भीती शेअर केलीय.

काजलने लिहिलं की, त्या शक्तींविषयी मी शिकत आहे, ज्या मला माहिती नव्हत्या. त्याचसोबत मी भीतीशी दोन हात करायलाही शिकतेय. तिच्या या पोस्टवर फॅन्स तिचे कौतुक करत आहेत. याआधी तिने इन्स्टाग्रामवर ओटीभरणीचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये ती पती गौतम किचलू आणि परिवारासोबत ओटीभरणीचा सोहळा एन्जॉय करताना दिसते. तिने पती गौतम किचलूसोबत एक सुंदर फोटोदेखील शेअर केलाय. फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.

बॉलीवूडमध्येदेखील अभिनयाने सर्वांना घायळ करणाऱ्या काजलला लेडी सिंघम म्हटलं जातं. काजल रिअल लाईफमध्येही एकदम टकाटक राहते. तिचं मुंबईमध्ये कोटींचं आलीशान घर आहे. काजल मुंबईची राहणारी आहे. बॉलीवूडमध्ये खूप कमी चित्रपटात दिसली असली तरी साऊथच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश आहे. ती आपल्या एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये घेते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT