Latest

Kabir Bedi : कबीर बेदी यांच्या मुलाने ‘स्किझोफ्रेनिया’मुळे केली होती आत्महत्त्या; अभिनेत्याचा मोठा खुलासा

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थने 1997 मध्ये आत्महत्या केली होती. अलीकडेच, नुकतेच अभिनेता कबीर बेदी यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूवर उघडपणे बोलताना दिसले. बेदी यांनी सांगितले की त्याच्या मृत्यूने मला 'भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त' केले आणि काही प्रमाणात यासाठी मीच दोषी असल्याचेही वाटले. कबीर बेदी यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या आत्मचरित्रात स्वत:ला आलेल्या यश – अपयश कोणत्या पद्धतीने लिहायचे होते. ज्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनाच्या या टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळाली. (Kabir Bedi)

सिद्धार्थ हा कबीर यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता, प्रोमिता या एक शास्त्रीय नृत्यांगना होत्या. सिद्धार्थने 1990 च्या दशकात कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिक्षण घेतले. नंतर त्याला स्किझोफ्रेनिया झाल्याचे निदान झाले. 1997 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात कबीर बेदी यांनी त्यांचे आत्मचरित्र 'स्टोरीज आय मस्ट टेल' बद्दल सांगितले. "मी पुस्तकात जे काही लिहिले आहे ते मी माझ्या मनापासून लिहिले आहे. माझ्या शोकांतिकांबद्दलही मी सविस्तर लिहिले आहे. त्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही, कारण मी जे काही लिहिले आहे ते सत्य आहे आणि त्यांना ते माहीत आहे. लपवण्यासारखे काही नाही'. (Kabir Bedi)

कबीर बेदी म्हणाले, "माझ्या आयुष्यात चढ-उतार आले. मी दिवाळखोर झालो, अनेक चुका झाल्या, ज्याबद्दल मी पुस्तकात लिहिले आहे. चुकीच्या गुंतवणुकीमुळे माझे खूप नुकसान झाले. माझा मुलगा स्किझोफ्रेनियाशी झुंज देत असताना हे सर्व घडले. मी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने आत्महत्या केली, पण मी त्याला रोखू शकलो नाही आणि मला त्याबद्दल दोषी वाटते. त्याच वेळी मी आर्थिक संकटातून गेलो होतो. मी ऑडिशनसाठी जायचो आणि मला काय करावे हे कळत नव्हते. त्यामुळे बरेच प्रोजेक्ट माझ्या हातातून निसटले. मी पुन्हा उभा राहिलो आणि हा सर्व माझ्या प्रवासाचा एक भाग आहे. कबीर बेदी यांनी १९७१ मध्ये हलचल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Kabir Bedi)

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT