पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेला आव्हान देणारी याचिका तेलंगणाच्या बीआरएस नेत्या के. कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु दोन दिवसातच के.कविता यांनी त्यांची याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. (K Kavitha withdraws Plea)
के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीकडून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या सत्र न्यायालयाने २३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. दरम्यान के.कविता यांनी या प्रकरणात ईडीच्या समन्सला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. दरम्यान त्या शनिवार २३ मार्च पर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत. (K Kavitha withdraws Plea)
हे ही वाचा: