पुढारी ऑनलाईन डेस्क : 'शिवसंग्राम'चे संस्थापक विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे (SPP) अध्यक्ष शरद पवार यांची आज (दि.३) मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. माझे राजकारणात सक्रीय होणे यावरच चर्चा झाली. आता निर्णयाची प्रतिक्षा आहे, असे ज्योती मेटे यांनी पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
शरद पवार यांच्यासोबत राजकारणाबाबत चर्चा झाली आहे. मी शासकीय सेवेत होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतची भूमिका आणि वाटचाल या अनुषंगाने चर्चा झाली. राजकारणात अधिक सक्रीय होणे यावरच जास्त चर्चा झाल्याचे ज्योती मेटे यांनी सांगितले.
हेही वाचा :