Latest

J&K News : उधमपूर येथे बसमध्ये 24 तासात दुसरा स्फोट

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K News जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील जुन्या बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये गुरुवारी पहाटे आणखी एक रहस्यमय स्फोट झाला. गेल्या २४ तासांतील हा दुसरा स्फोट आहे.

J&K News मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दल घटनास्थळी हजर आहेत.

दरम्यान, बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास डोमाईल चौकात बसमध्ये असाच गूढ स्फोट झाला असून त्यात दोघे जण जखमी झाले आहेत.

दुसरा स्फोट काल रात्री झालेल्या स्फोटाच्या ठिकाणापासून अवघ्या 4 किमी अंतरावर झाला.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT