Latest

J&K News : लष्कराच्या श्वानाने शोधला भूसुरुंग, मोठी दुर्घटना टळली

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  लष्कराच्या श्वानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी (दि.15) नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भूसुरुंग असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर  लष्कराच्या श्वानाने नियंत्रण रेखा (lOC) जवळील भूसुरुंग शोधून काढला. कॅनाइन एल्विन असे या श्वानाचे नाव आहे. वेळीच शोधल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे लष्कराने सांगितले. (J&K News)

लष्कराच्या कॅनाइन एल्विनने शनिवारी (दि 15 ) जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील मांजाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एक भूसुरुंग शोधून काढले आहे. सुंदरबनी, राजौरी येथील बेरी पट्टण भागात पेलोड वाहून नेणारे ड्रोन जप्त केल्याच्या एका दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सुंदरबनी येथून 5 एके मॅगझिन, एके-47 च्या 131 राउंड, काही गोफण आणि 2 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. लागोपाठ अशा दोन घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

यापूर्वी 9 एप्रिल रोजी, भारतीय सैन्याने पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडल्यानंतर एका घुसखोराला ठार मारले होते. तर इतर दोघांना पकडले होते.  त्यांच्याकडून सुमारे 17 किलो वजनाच्या अंमली पदार्थांच्या 14 पॅकेटसह तीन बॅग, पाकिस्तानी चलन, काही कागदपत्रे आणि खाण्यायोग्य वस्तू जप्त केल्या होत्या.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT