Latest

Jemimah Rodrigues आता क्रिकेट सोडून खेळणार हॉकी, वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्शन न झाल्याने घेतला निर्णय

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स लवकरच हॉकी खेळताना दिसणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये न्युझीलंड येथे होणाऱ्या आयसीसी वनडे विश्व चषकासाठी सिलेक्शन न झाल्याने ती निराश होती. जेमिमा रॉड्रिग्स हिची आक्रमक फलंदाज अशी ओळख आहे. आता जेमिमा रॉड्रिग्स क्रिकेट नंतरचा तिचा दुसरा आवडता खेळ 'हॉकी' खेळताना दिसेल. ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान मुंबई येथे वेलिंग्टन कॅथलिक जिमखाना रिंंक टूर्नामेंट होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये जेमिमा रॉड्रिग्स अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट्स या हॉकी टीमकडून खेळताना दिसेल. जेमिमा रॉड्रिग्स हिच्या टीमने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या फोटो मध्ये जेमिमा हॉकी स्टीक हातात घेऊन उभी असल्याची दिसत आहे.  (Jemimah Rodrigues)

शाळेत असताना हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळांमध्ये आवड

२१ वर्षांची असलेल्या Jemimah Rodrigues ला शाळेत असताना हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळांमध्ये आवड होती. जेमिमा हिने आठ वर्षाची असल्यापासून क्रिकेट आणि हॉकी खेळण्यास सुरूवात केली. क्रिकेट मध्ये मोठ्या स्तरावर पोहचण्याअगोदर स्कूल स्पोर्ट्स असोशिएशन मध्येही तिने चांगली कामगिरी केली होती. इंटर स्कूल पातळीवर बांद्रा सेंट जोसेफ स्कूलकडून तिला संधी मिळाली होती. याच्याव्यतिरिक्त १७ वर्षाखालील स्तरावर मुंबई आणि महाराष्ट्रासाठीही ती खेळली होती. (Jemimah Rodrigues)

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT