Latest

JEE Main : जेईई मुख्य परीक्षेत नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) जेईई मुख्य परीक्षा- २०२२ (JEE Main) सत्र एकचा निकाल जाहीर केलाय. या परीक्षेत अद्वय क्रिष्णा हा विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिल्या स्थानावर आला आहे. तो महाराष्ट्रातील नागपूरचा आहे. (JEE Main)

अद्वयला दहावी परीक्षेत ९६.८ टक्के मिळाले होते. तो जैन इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे. अद्वय हा मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने दहावीत प्रज्ञा शोध परीक्षेतही यश मिळवले होते. अद्वयचे वडील वेकोलोमध्ये नोकरीला आहेत.

या परीक्षेची अंतिम उत्तराची यादी ६ जुलैला प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित टक्के मिळवले आहेत ते पुढील सत्रात म्हणजे दुसऱ्या दोनसाठी पात्र ठरले आहेत.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ – 
jeemain.nta.nic.in
ntaresults.ac.in
nta.ac.in

दरम्यान, 'एनटीए जेईई' मुख्य परीक्षा सत्र २ ही परीक्षा २१ ते ३० जुलै या कालावधीत होईल. सत्र २ ची परीक्षा पार झाल्यानंतर 'कौंसिलिंग'साठी 'ऑल इंडिया रँक' आणि 'कट ऑफ: जाहीर होईल.

SCROLL FOR NEXT