Latest

सातारा : भोसे येथील जवान विपुल इंगवले यांना अखेरचा निरोप (व्‍हिडीओ)

अनुराधा कोरवी

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा :  भोसे (ता. कोरेगाव) येथील जवान विपुल दिलीप इंगवले हे कर्तव्य बजावत असताना बर्फवृष्टी झाल्याने जखमी झाले होते.  रविवारी (दि.५) त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी भोसे या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

भोसे येथील विपुल दिलीप इंगवले याला शालेय जीवनापासूनच सैनिक बनण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये शिकत असताना एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. सैनिकी जीवनाची आवड असणाऱ्या विपुल इंगवले यांची CORPS OF SIGNAL विभागात निवड झाली होती. गेली सहा वर्ष विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. दरम्यान त्यांची सियाचिन येथे पोस्टिंग झाली होती.

सियाचिन येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना अति थंडीमुळे मेंदूला क्षती पोहोचल्याने सैनिकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.६) रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी भोसे येथे आणण्यात आला. या ठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT