पुढारी ऑनलाईन : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची बातमी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. त्यांनी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पूर्णपणे फिट असल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुमराह दुखापतीमुळे त्रस्त होता.
जसप्रीत बुमराह १८ ऑगस्टपासून आयर्लंडमधील तीन सामन्यांच्या T20I मालिकेदरम्यान पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे, अशी पुष्टी बीसीसीआयने गुरुवारी केली. "बुमराह पूर्णपणे फीट आहे आणि तो कदाचित आयर्लंडला जाऊ शकतो," असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नवी दिल्लीत विश्वचषक यजमान संघटनांच्या बैठकीनंतर बोलताना सांगितले.
मार्चमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर बुमराह बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या T20I मालिकेनंतर तो खेळलेला नाही.
आयर्लंडमधील T20Is नंतर टीम इंडियाचा पुढील दौरा श्रीलंकेत ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान आशिया चषक असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सप्टेंबरमध्ये घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेकडे विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून पाहिले जाणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी बोलताना बुमराहच्या (Jasprit Bumrah) पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली होती.
हे ही वाचा :