Latest

Janhvi Kapoor : जान्हवीच्या १.६ लाखांच्या एम्बेलिश्ड स्टारफिश ड्रेसची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फॅशनिस्टा जान्हवी कपूरने निळ्या आऊटफिटमध्ये धुमाकूळ घातला आहे. तुम्ही जर तिचे हे फोटो पाहिला तर तुम्ही ते पाहातच राहाल. जान्हवी आदित्य रॉय कपूरसोबत एका कार्यक्रमात दाखल झाली. (Janhvi Kapoor) यावेळी सर्वांचे श्वास रोखले गेले. तिने परिधान केलेला निळा ड्रेस डायनामिक आणि परफेक्ट बॉडी शेप आणणारा होता. म्हणूनच की काय तिला इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी फॅशनिस्टा म्हटले जात आहे. (Janhvi Kapoor)

जान्हवीचे शॉर्ट मिनी रॉयल ब्ल्यू कलर ड्रेसमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळताहेत. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हॉल्टर नेकलाईन आणि क्रिस्टल स्टारफिश पेंडेंट ज्वेलरी तिने गळ्यात घातली आहे. तिने हे फोटो पोस्ट करताना कोणतीही कॅप्शन लिहिलेली नाही. ग्लॅममेकअप आणि स्मोकी आईज, ग्लॉसी लिप्स, हातात ऑक्साईड अंगठी असा तिचा लूक परिपूर्ण दिसतो. विशेष म्हणजे हा ड्रेस १.६ लाखांचा असल्याचे म्हटले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT