Latest

Janhvi-Khushi Kapoor : जान्हवी-खुशी कपूर सुंदर साडीत, धनत्रयोदशीला फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जान्हवी आणि खुशी कपूरने ट्रॅडिशनल लूकमध्ये फोटोशूट केला आहे. विशेष म्हणजे, दोघींनीही धनत्रयोदशीला शुभेच्छा देत आपले फोटो शेअर केले आहेत. दिवाळी सणानिमित्त खुशी – जान्हवीने १० नोव्हेंबर रोजी धनतेरस पूजेनिमित्त फोटो शेअर केले आहेत. (Janhvi-Khushi Kapoor) दोघीही साडीमध्ये दिसत असून जान्हवीने आपली लव्हेंडर रंगाची साडी रिपीट केली आहे. जान्हवी कपूर-खुशी कपूर धनत्रयोदशीला पूजेसाठी करण जोहरच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी दोघीही साडीत दिसल्या. पूजेत 'द आर्चीज' फेम वेदांग रैनादेखील हजर होता. (Janhvi-Khushi Kapoor)

संबंधित बातम्या –

दरम्यान, याआधी जाह्नवी कपूरने हा आऊटफिट रूमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिरुपती यात्रेदरम्यान, परिधान केला होता. दुसरीकडे, खुशी कपूरने जी मरून साडी नेसली होती. तिचं साडी जान्हवीने आंध्र प्रदेशातील तिरुमालामध्ये श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात नेसली होती.

जान्हवीने शेअर केले फोटोज

हे फोटोज खुशी कपूरसोबत जान्हवी कपूरने आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोज शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं 'हॅप्पी धनतेरस.

धर्मा प्रोडक्शनमध्ये पूजा

करण जोहरच्या धर्मा ऑफिसमध्ये धनतेरस पूजा करण्यात आली. या पूजेमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, विक्की कौशल, अनन्या पांडेसह बॉलीवूडचे सेलेब्स सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT