Latest

जालना : परतूरातील व्यापाऱ्याची तूर विक्रीतून १५ लाखांची फसवणूक

backup backup

परतूर, पुढारी वृत्तसेवा : परतूर येथील दोन व्यापार्‍यांनी २०१९ मध्ये २५३.८० किंट्टल तूर ओळखीच्या व्यापारी यांना विक्री केली होती. मात्र, सदरील व्यापारी आणि दलालाकडून पैसे देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात येताच परतूर येथील व्यापारी यांच्या फिर्यादी वरुण गुजरातमधील व्यापारी व दलालावर दि. ३ जानेवारी २०२२ रोजी परतूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून गुजरातमधील बडोदा येथील दलालाच्या मुसक्या आवळून अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता ७ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, "परतूर येथील व्यापारी नेमीचंद हेमराज कोटेचा आणि वेणुगोपाल नंदलाल भुतडा यांनी सुरत येथील दालमीलचे व्यापारी बाबु मोहमंद गलेरीया यांच्या शाईन इंटरप्राईजेससोबत नेहमी तूर माल विक्रीचा सात वर्षांपासून व्यापार करत होते.

व्यावसायिक संबंध आहेत. सदरील व्यवहारात मध्यस्थ दलाल चंद्रकांत ठक्कर (रा. बडोदा) यांच्या मार्फत तूर माल विक्री केल्यानंतर मालाची किंमत चार ते पाच दिवसात मिळत होती. अशा प्रकारे शाईन इंटरप्राईजेस मालक बाबू मोहमंद गलेरीया रा. सुरत (गुजरात) व चंद्रकांत ठक्कर रा. बडोदा यांनी त्यांच्या व्यवहारामुळे विश्वास संपादीत केला. सदरील विश्वासाच्या संबंधातुन श्रद्धा ट्रेडर्स प्रोप्रा. वेणुगोपाल नंदलाल भुतडा यांनी १००. २० क्विंटल तूर दि २१ फेब्रुवारी २०१९ रोजी आठ लाख ८३ हजार ६६५ रुपयाच्या तुर, तसेच महाविर ट्रेडिंग प्रोप्रा नेमीचंद हेमराज कोटेचा यानी १५३.६० क्विंटल तुर दि २१ जानेवारी २०१९ रोजी ८ लाख ९४ हजार ७२० रुपये, असा आकून दोघांचा १४ लाख ७८ हजार ३८५ रुपयाच्या तुरी गुजरात कर्नाटक ट्रान्सपोर्ट जालना येथून यांना गाडी नं. जी जे ०४ एटी ८०१९ या गाड्यामध्ये शाईन इंटरप्राईजेस मालक बाबुभाई मोहमंद गलेरीया यांच्याकडे दलाल चंद्रकांत ठक्कर रा. बडोदा यांच्या मार्फत विक्री केला.

सदरील माल विक्री केल्यानंतर आठ ते दहा दिवसांत मालाची पैसे येणे अपेक्षित होते. परंतु सदरील विक्री मालाचे पैसे न आल्याने व्यापारी यांनी बाबुभाई मोहमंद गलेरीया प्रो. प्रा. शाईन इंटरप्राईझेस यांच्याशी संपर्क करुन तुरीचे पैसे मागणी केली. यावेळी दोन महिन्यात खात्यावर आरटीजीएस द्वारे पैसे पाठवण्याचे आश्वासन दिले. दोन महिन्यांनी परतूर येथील व्यापारी यांनी बाबभाई मोहमंद गलेरीया यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांच्या दालमीला आग लागली मोठे नुकसान झाल्याचे कारण संगितले.

सदरील नुकसानी बाबतचा इन्शुरन्स क्लेम मंजूर होण्यास एक वर्ष लागेल क्लेन मंजूर होताच पैसे देण्याचे आश्वासन या दोघांनी सर्वांनी उडवा उवडीची उत्तरे दिली. सदरील व्यापारी आणि दलाला यांनी फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने शाईन इंटरप्राईझेस प्रोप्रा.बाबु मोहमंद गलेरीया व दलाल चंद्रकांत ठक्कर रा. बडोदा यांनी मिळुन संगनमताने हेतु पुरस्कररित्या १४ लाख ७८ हजार ३८५ रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस नाईक अशोक गाढवे, पोको सुनील होंडे, पोहेकों नंदू खंदारे, यांनी तपास करून दलाल चंद्रकांत ठक्कर रा. बडोदा याला गुजरात मधून अटक करून परतूर न्यायालयासमोर शुक्रवारी हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी अशोक गाढवे यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT