Latest

जळगाव : भुसावळात पेपर मिलला भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारातील पेपर मिलला रविवार (दि.28) आग लागल्याची घटना घडली. या आग्नितांडवात पेपर तसेच मिलची संपूर्ण यंत्रसामग्री जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून विविध ठिकाणच्या अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले आहे. रविवार असल्यामुळे कंपनी बंद होती, त्यामुळे आत कुणीही कर्मचारी नसल्याने सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारातील गट नं. १०८ मध्ये राजेंद्र चौधरी यांच्या मालकीची सुदर्शन पेपर मिल आहे. या ठिकाणी ड्युप्लेक्स नावाच्या इम्पोर्टेट पेपरची निर्मिती होते. देशात मोजक्याच ठिकाणी या पेपरची निर्मिती होते. त्यानुसार सुदर्शन पेपर मिलमध्ये या पेपरची निर्मिती होत विदेशात हा पेपर निर्यात होते. रविवार असल्याने आज दि. २८ रोजी कंपनी बंद होती. दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. आग इतकी भिषण होती की, सर्व सामग्री जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

४५० टन मालासह साहित्य जळून खाक…

या घटनेत कंपनीत तयार झालेला जवळपास ४५० टन ड्युप्लेक्स पेपरचा माल, कच्चामाल, यंत्र सामग्री आदी कोट्यवधीचे साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भिषण होती की, दुरवरुन सुध्दा आगीचे लोळ दिसत होते. आगीची घटना लक्षात येताच स्थानिक नागरीकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना तसेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. घटनेची माहीती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल पवार, पोहेकॉ. सुरज पाटील, गणेश गव्हाळे, जगदीश भोई यांच्यासह पथक, तलाठी जयश्री पाटील, सर्कल योगिता पाटील, महावितरणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी भुसावळ, दीपनगर, जळगाव या ठिकाणाहून अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते. या बंबांनी आग आटेक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.