Latest

जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

गणेश सोनवणे

जळगाव : तापी आणि पूर्णा या नद्यांचे उगमस्थान आणि हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे २४ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात ७५,५४३.०० क्यूसेस प्रतीसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिना अर्धा संपण्यावर आला, तरीदेखील जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र तापी नदीच्या उगमस्थान असलेल्या मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणातून टप्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात असून हतनूर धरणाचे २४ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ७५,५४३.०० क्यूसेस एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून गुरेढोरे नदीच्या पात्रात सोडूनये व मनुष्यप्राणी यांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT