Latest

जळगाव : अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसुती ; बाळाचा मृत्यू

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  : प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झालेली अल्पवयीन मुलगी गर्भवती होवून तिची प्रसूती झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यात जन्मलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. तिचे मयुर रमेश कोळी या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यादरम्यान लग्नाचे आमिष दाखवित अल्पवयीन मुलीला सुरत येथे पळवून नेले होते. तसेच तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी अपहरणासह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संशयित मयुर यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

जामीनावर सुटका झाल्यानंतर मयुर याने पुन्हा अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. याचदरम्यान मुलीचा पाय भाजला पायावर उपचार सुरु असतांना मुलगी ही गर्भवती असल्याचे समोर येवून तीची प्रसूती झाली. बाळ कमी दिवसाचे असल्याने समोर आले. काल सोमवार, दि. ३१ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन अत्याचार करणार्‍या संशयित मयुर कोळी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT