Latest

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- चोपडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अमळनेर न्यायालयाने ३ मे रोजी निकाल दिला असता. लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्याप्रमाणे एकूण २० वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड आरोपीला ठोठावण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात शेतकरी कुटुंबात हा घृणास्पद प्रकार संशयित आरोपीने सन-२०२० साली केला होता. १६ वर्षीय पीडितेचे आई-वडील हे शेतात गेल्याचा गैरफायदा घेऊन त्याने वेळोवेळी तरुणीवर एकटे असल्याचे लक्षात घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला धमकावले. यामुळे सदर तरुणी ही अत्याचारातून गर्भवती झाली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव येथील बालकल्याण समिती कार्यालयात येथे तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यानुसार अमळनेर न्यायालयात संशयित आरोपी ज्ञानेश्वर रामदास कोळी (वय ४५, रा. चुंचाळे ता. चोपडा) याच्याविरोधात खटला चालविण्यात आला. जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्यापुढे खटल्याचे कामकाज चालले. खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी आणि पीडित तरुणी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, तपासणी अधिकारी पोलीस संदीप आराख यांचा तपास महत्त्वाचा ठरला.

सरकारी वकील ॲड. किशोर बागुल यांनी सदर सबळ पुरावे न्यायालयात मांडले. न्यायालयाने ३ मे रोजी निकाल दिला असता. संशयित आरोपी ज्ञानेश्वर कोळी याला २० वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावला.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT