Latest

‘मन की बात’ नव्‍हे ही तर महत्त्वाच्या मुद्द्यांवरील ‘मौन की बात’ : काँग्रेसची टीका

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या रेडिओवरील मन की बात या कार्यक्रमाचे आज १०० भाग पूर्ण झाले. १०० वा भाग प्रसारीत होण्‍यापूर्वीचा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश ( Jairam Ramesh )  यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर बोचरी टीका केली.

जयराम रमेश यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, आज देशभरात मन की बात कार्यक्रमाच्‍या १०० व्‍या भागाबाबत जोरदार चर्चा आहे; पण पंतप्रधान हे चीन, अदानी, गरिबी, वाढलेली आर्थिक विषमता, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, महिला कुस्तीपटूंचा अपमान, शेतकरी संघटनांना दिलेली आश्वासने विरोधी, कर्नाटकसारख्या राज्यांतील तथाकथित डबल इंजिन सरकारचा भ्रष्टाचार, अशा अनेक कारणांमुळे चीन, अदानी, आर्थिक विषमता, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती. भाजपसोबत गुंडांचे जवळचे संबंध अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही 'मौन की बात' आहे.

'आयआयएम' रोहतकने 'मन की बात'च्या परिणामावर एक बनावट अभ्यास केला आहे, तर शिक्षण मंत्रालयानेच त्याच्या संचालकाच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले करत पंतप्रधान मोदी हे महत्त्‍वाच्‍या मुद्‍यांवर मौन आहेत, असा आरोपही जयराम रमशे यांनी केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT