Latest

Vice President Election : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्‍ट्रपती

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार जगदीप धनखड हे ५२८ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले.उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी लोकसभा व राज्यसभेचे निवडून आलेले आणि नामनिर्देशित असे ७८० खासदार मतदार होते. यामध्ये एकुण ७२५ खासदारांनी मतदन केले. त्यापैकी ७१० मते वैध तर १५ मते अवैध ठरली.

विजयासाठी आवश्यक मतांचा आकडा हा ३५६ एवढा होता. त्यापैकी भाजपप्रणित रालोआचे उमेदवार जगदीप धनखड ५२८ मते मिळवून विजयी झाले. त्याचवेळी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली. त्यामुळे जगदीप धनखड हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.

उपराष्‍ट्रपतीपदासाठी आज, शनिवारी (दि.६ ऑगस्ट) मतदान झाले. संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहांमधील ७२५ खासदारांनी मतदान केले. तर ५५ खासदारांनी मतदान केले नाही. अशा प्रकारे एकूण ९३ टक्के खासदारांनी मतदान केले. ५५ खासदार गैरहजर राहिले त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे ३४, भाजप, समाजवादी पक्ष आणि शिवसेनेचे २-२ खासदार आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या एका खासदाराचा समावेश आहे. तृणमूलचे खासदार मतदान करणार नाहीत हे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते.

उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी संसद भवनामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.

SCROLL FOR NEXT