Latest

IT Raids: तमिळनाडूत ४० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी; डीएकेच्या ‘या’ मंत्र्याच्या अडचणी वाढल्या

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: तमिळनाडूतील डीएके पक्षाचे नेते मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आयकर विभाग सातत्याने छापे टाकत आहे. दरम्यान आजही (दि.२६) प्राप्तिकर विभागाने मंत्री सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित ४० ठिकाणी छापे (IT Raids) टाकले. यामध्ये संबंधित मंत्र्याच्या निवासस्थानावर, सरकारी कंत्राटदारांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे.

तमिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते सेंथिल बालाजी यांच्याकडे सध्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभाग आहे. दरम्यान कथित भ्रष्टाचारात घोटाळ्यात मंत्री सेंथिल बालाजी यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय तसेच संबंधित कंत्राटदार देखील गुंतले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आयकर विभागाकडून (IT Raids)  चेन्नई, करूर आणि इतर ठिकाणी सध्या छापे टाकण्यात येत आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT