Latest

इजिप्तमधील ‘सर्वोच्च’ सन्‍मानानंतर PM मोदी म्‍हणाले, “भारत आणि …”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिका दौर्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे इजिप्‍तच्‍या दौर्‍यावर आहेत. आज ( दि.२५) कैरो येथे इजिप्तचे राष्ट्रपती ( Egyptian President ) अब्देल फताह अल-सिसी ( Abdel Fattah al-Sisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे 'ऑर्डर ऑफ द नाईल' ( Order of the Nile ) पुरस्काराने सन्मानित केले. हा इजिप्‍तचा सर्वोच्‍च राज्‍य सन्‍मान आहे.
(PM Narendra Modi Egypt Visit )

'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्‍कारावर नरेंद्र मोदी यांनी मोदींनी ट्विट केले आहे की, "मी अत्यंत नम्रतेने 'ऑर्डर ऑफ द नाईल' स्वीकारतो. या सन्मानासाठी मी इजिप्तचे सरकार आणि लोकांचे आभार मानतो. हे भारत आणि आपल्या देशातील लोकांप्रती त्यांची जिव्हाळा आणि आपुलकी दर्शवते."

पंतप्रधान मोदींनी दिली 'हेलिओपोलिस वॉर मेमोरियल'ला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इजिप्तची राजधानी कैरो येथील हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.

PM Modi Egypt Visit : आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक…

अल-हकीम मशीद हे कैरोमधील अकराव्या शतकातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे. ही मशीद भारत आणि इजिप्तमधील समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीचे महत्त्व म्हणजे अल-हकीम मशिदीचे उल्लेखनीय जीर्णोद्धार, जे दाऊदी बोहरा समुदायाच्या समर्पण आणि समर्थनामुळे शक्य झाले आहे. भारतीय डायस्पोरातील बोहरा समुदायाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबवाला म्‍हणाले की, आमच्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, आज पंतप्रधान मोदी येथे आले. त्यांनी आमच्‍याशी संवाद साधला. आमच्यासोबतही त्यांनी आमच्या बोहरा समाजाच्या हिताची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याशी संवाद साधला तेव्हा आम्हाला एक कुटुंब असल्यासारखे वाटले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT