Latest

ISRO : ‘विक्रम-एस’- पहिले खासगी रॉकेट उड्डाणासाठी सज्ज; श्रीहरिकोटातून होणार आज प्रक्षेपण

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : देशातील पहिले खाजगीरित्या विकसित करण्यात आलेले 'विक्रम-एस' हे पहिले खासगी रॉकेट उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) श्रीहरिकोटा येथील केंद्रातून 'विक्रम एस' या पहिल्या खासगी रॉकेटचे आज प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणामुळे भारतीय अवकाश क्षेत्र आज एका नवीन उंचीला स्पर्श करणार आहे. चार वर्षापूर्वी स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने विक्रम एस या रॉकेट प्रक्षेपणाची तयारी सुरू केली होती. याची तयारी आज पूर्ण झाली आहे. देशाच्या अंतराळ उद्योगात अनेक दशकांपासून इस्रो या सरकारी संस्थेची मालकी असलेल्या क्षेत्रात या प्रक्षेपणाने खासगी क्षेत्राचा प्रवेश चिन्हांकित केला जाणार आहे.

शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता विक्रम-एस या पहिल्या खासगी रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वी हे रॉकेट १५ नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्याची योजना होती. सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाल्यानंतर विक्रम-एस हे रॉकेट ८१ किमी उंचीवर पोहोचेल. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटचे नाव ठेवण्यात आले आहे.

इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) चे अध्यक्ष पवन गोयंका म्हणाले, भारतातील खासगी क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप आहे. रॉकेट लॉन्च करण्यासाठी अधिकृत असलेली पहिली भारतीय कंपनी बनल्याने त्यांनी स्कायरूट या अंतराळ उद्योगातील कंपनीचे अभिनंदनही केले आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने अवकाश उद्योग खासगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंतर स्कायरूट एरोस्पेस ही भारतीय अंतराळ कार्यक्रमात पाऊल टाकणारी भारतातील पहिली खासगी क्षेत्रातील कंपनी ठरली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT